
या सरत्या वर्षाला निरोप देताना ईश्वरा जवळ एवढेच मागणे आहे की हे ईश्वरा मला इतरांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याची संधी मिळू दे...तुझा माझ्यात जो ' ईश्वरी अंश ' आहे तो मी कायम जपू दे आणि यामुळे माझ्या आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख आणि शांतता नांदू दे..
हे ईश्वरा मला तुझे स्मरण राहू दे आणि आजपर्यंत आपल्या अस्मितेचा बळी देऊन मी जी काही भावनांची अनावश्यक गाठोडी सांभाळली होती ती टाकून देण्याचे बळ दे...
नवीन वर्षाला सामोरे जाताना हीच प्रार्थना आणि माझ्या अस्मितेच्या शुभ्र पंखाना नवसंजीवनी लाभो हेच स्वप्न...
2 comments:
Dear Ratna Madam,
I just have one request, please please write one book, it will be super hit..
You are master of words and your writing flows like a calm river and its slow currents some where touch our hearts, thinking and senses.
I really like your writing.
Khushal
व्वा. छान ब्लॉग. धावती नजर टाकली आहे. सावकाश आस्वाद घेईन. पण वरवर पाहूनही ब्लॉग आवडला. नवीन वर्षात दिलेल्या या भेटीसाठी धन्यवाद..
श्री. श्रीपाद कोठे, नागपूर
Post a Comment