चंद्रशेखर गोखलेंची एक चारोळी आठवली...
काही नाती तुटत नाहीत,
ती नकळत मिटून जातात...
जशी बोटावर रंग ठेऊन
फुलपाखरे उडून जातात....
आता वाटते खरच नाती तुटू नयेत ती अशीच मिटून जावीत, विरून जावीत म्हणजे जास्त त्रास होत नाही....
चंद्रशेखर गोखलेंची एक चारोळी आठवली...
काही नाती तुटत नाहीत,
ती नकळत मिटून जातात...
जशी बोटावर रंग ठेऊन
फुलपाखरे उडून जातात....
आता वाटते खरच नाती तुटू नयेत ती अशीच मिटून जावीत, विरून जावीत म्हणजे जास्त त्रास होत नाही....
वाटलं नव्ह्तं मला,
असं काही घडेल
आपल्या मैत्रीच्या वृक्ष,
असा कोलमडून पडेल...
याच मैत्रीला कधी काळी,
मधाचा गोडवा होता,
त्या दिवसात रोजच
दिवाळी पाडवा होता....
जेव्हा रडत होतो,
तेव्हा मैत्रीनेच हसवलं..
नुकताच हसायला शिकलो,
आणि पुन्हा मैत्रीनेच रडवलं....
चुक तुझी ही नसावी,
किंवा माझी ही नसावी...
काय सांगावं आपल्या,
दैवातच खोट असावी...
कारणा शिवाय दुरावलो,
याचच वाईट वाटतं...
रडून रडून शेवटी,
डोळ्यातलं पाणी आटतं...
विसरुन सारं दु:ख,
मी मनाला हवं आवरयला...
तु परतनार असशील तर,
मी तयार आहे सावरायला...
तु परते पर्यंत मी,
तुझीच वाट पाहीन..
आत्ताच काय?
अजन्म तुझाच मित्र राहीन...
जपुन पावलं टाकत जा,
चुकुनही घसरु नकोस...
आठवण नाही काढलीस,
तरी मला विसरु नकोस...
वाटलं नव्ह्तं खरचं,
कधी असं घडेल...
आपल्या मैत्रीच्या वृक्ष ,
असा कोलमडून पडेल...
तू विसरु शकशिल का?
(Net var vachleli ek rudaysparshi kavita)
तू विसरु शकशिल का?
ते गोड क्षण,
माझं हळवं मन;
तुझी अखंड बडबड, आणि माझं नि:शब्द मौन..
तू कसं विसरु शकतेस?
तूझं मुग्धपणे हसणं,
हसताना मोहक दिसणं;
तुला डोळ्यात साठवताना,
माझं भान हरपणं...
तू कसं विसरु शकतेस?
तुझं ते अलगदपणे माझ्या मिठीत शिरणं,
घरची आठवण काढुन उगाच मुसमुसणं;
तुझ्या हळवेपणाला मझ्यात समावुन घेताना,
माझं तुझी समजुत काढणं...
तू कसं विसरु शकतेस?
आपलं ते चांदण्यांखाली जागणं,
तुटलेला तारा पाहुन तुझं देवाकडे काहितरी मागणं;
जन्म-जन्मांच्या साथीची आण घेताना,
तुझा हात माझ्या हातात गुंफणं...
तू कसं विसरु शकतेस?
माझं ते तुझ्यासाठीचं तळमळणं,
तुझ्या स्वप्नांसाठी निद्रेची आराधना करणं;
तरीही नेहमी तुझ्या विचारात गढुन,
माझं रात्र रात्र जागणं...
तू कसं विसरु शकतेस?
तू कसं विसरु शकतेस;
माझं प्रेम, माझ्या भावना, माझं मन, माझ्या वेदना...
सांग, तू विसरु शकशिल का?
(Net var vachleli ek rudaysparshi kavita)
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो....
(Orkut var vachleli ek Romantic Kavita...)
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो
जेव्हा एकटं एकटं रहावसं वाटतं,
गोड हसणं मनातल्या मनात दाटतं,
कुणाचं तरी आपलेपण ह्र्दयात साठतं,
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो...
उघड्या डोळ्यांना स्वप्न पडतात,
प्रेमपाखर ही हसत रडतात,
स्वप्नांशी नाती जडतात,
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो...
इंद्रधनुचा प्रत्येक रंग अजुन तेजस्वी होतो,
वैशाख ही हिरवा होवुन् जातो,
सारा परिसर मंत्रमुग्ध होतो,
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो....
थंड हवा मंजुळ होवुन जाते,
चंद्राची कोर नवरुप घेते,
आकाशाचं छतं चांदण्यांनी भिजून जाते,
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो....
जेव्हा फक्त तिचीचं आठवण य़ेते,
फक्त ती आणि ती दिसते सगळीकडे,
अशक्य गोष्ट शक्य झाल्यासारखी वाटते,
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो....
(Orkut var vachleli ek Romantic Kavita...)
Orkut var vachleli...Mala aavdleli ek Niragas Kavita...
माझे तुझ्यावर प्रेम आहे….पण मी खोटे बोलले..
मी म्हंटले, माझे तुझ्यावर प्रेम आहे..
पण मी खोटे बोलले..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते..प्रेमापेक्षाही जास्त आहे..
कसे असु शकते प्रेम...इतके चांगले की, दोन अनोळखी…… दोस्त बनले, इतके निरागस की,
प्रेमही…..दोस्तीत गुंफ़ले गेले,
इतके हवेसे की, सर्व कॉल वाटत असतात तुझे,
इतके मुर्ख की, रोमिंग चाही चालतोय मला खर्च,
इतके प्रेरक की, सरळ आयुष्यही झाले आहे दिलखेचक,
इतके हळवे की , तुझ्यावरील संकटाने डोळे भरतात माझे,
इतके तेजस्वी की, तु आठवणिंनी ओजंळ भरलीय माझी,
इतके निस्वार्थि की, तुझ्या लग्नाला पाहुणी आहे मी..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते..
प्रेमापेक्षाही जास्त आहे..
प्रेमापेक्षाही जास्त आहे..
(Orkut var vachleli...Mala aavdleli ek Niragas Kavita...)
येशील तू माझ्यासोबत...
जगाच्या अंतापर्यंत...
रस्ता फक्त निमित्त रे....
खरं तर साथ तुझी हवीये जीवनाच्या अस्तापर्यंत
स्वप्न तुझे सोनेरी....
स्पर्श तुझा सोनेरी..
तुझ्या सहवासातील
माझा क्षण प्रत्येक सोनेरी..