Monday, August 11, 2008

तू विसरु शकशिल का?

तू विसरु शकशिल का?

(Net var vachleli ek rudaysparshi kavita)

तू विसरु शकशिल का?

ते गोड क्षण,

माझं हळवं मन;

तुझी अखंड बडबड, आणि माझं नि:शब्द मौन..

तू कसं विसरु शकतेस?

तूझं मुग्धपणे हसणं,

हसताना मोहक दिसणं;

तुला डोळ्यात साठवताना,

माझं भान हरपणं...

तू कसं विसरु शकतेस?

तुझं ते अलगदपणे माझ्या मिठीत शिरणं,

घरची आठवण काढुन उगाच मुसमुसणं;

तुझ्या हळवेपणाला मझ्यात समावुन घेताना,

माझं तुझी समजुत काढणं...

तू कसं विसरु शकतेस?

आपलं ते चांदण्यांखाली जागणं,

तुटलेला तारा पाहुन तुझं देवाकडे काहितरी मागणं;

जन्म-जन्मांच्या साथीची आण घेताना,

तुझा हात माझ्या हातात गुंफणं...

तू कसं विसरु शकतेस?

माझं ते तुझ्यासाठीचं तळमळणं,

तुझ्या स्वप्नांसाठी निद्रेची आराधना करणं;

तरीही नेहमी तुझ्या विचारात गढुन,

माझं रात्र रात्र जागणं...

तू कसं विसरु शकतेस?

तू कसं विसरु शकतेस;

माझं प्रेम, माझ्या भावना, माझं मन, माझ्या वेदना...

सांग, तू विसरु शकशिल का?

(Net var vachleli ek rudaysparshi kavita)

No comments: