वाटलं नव्ह्तं मला,
असं काही घडेल
आपल्या मैत्रीच्या वृक्ष,
असा कोलमडून पडेल...
याच मैत्रीला कधी काळी,
मधाचा गोडवा होता,
त्या दिवसात रोजच
दिवाळी पाडवा होता....
जेव्हा रडत होतो,
तेव्हा मैत्रीनेच हसवलं..
नुकताच हसायला शिकलो,
आणि पुन्हा मैत्रीनेच रडवलं....
चुक तुझी ही नसावी,
किंवा माझी ही नसावी...
काय सांगावं आपल्या,
दैवातच खोट असावी...
कारणा शिवाय दुरावलो,
याचच वाईट वाटतं...
रडून रडून शेवटी,
डोळ्यातलं पाणी आटतं...
विसरुन सारं दु:ख,
मी मनाला हवं आवरयला...
तु परतनार असशील तर,
मी तयार आहे सावरायला...
तु परते पर्यंत मी,
तुझीच वाट पाहीन..
आत्ताच काय?
अजन्म तुझाच मित्र राहीन...
जपुन पावलं टाकत जा,
चुकुनही घसरु नकोस...
आठवण नाही काढलीस,
तरी मला विसरु नकोस...
वाटलं नव्ह्तं खरचं,
कधी असं घडेल...
आपल्या मैत्रीच्या वृक्ष ,
असा कोलमडून पडेल...
2 comments:
kavita khoopch aavadali. Shaletalya tutalelya maitrinichi parat akada khoop aathavan aali.
Sharmila
kavita vachalyavar kharch khup javlachi maitri ,khup manapasun aathavali,
Post a Comment