दगड म्हणाला आय आय,
परी म्हणाली तू तर दगड,
तुला का व्हावी परी जड़,
दगड म्हणाला इथे पहा,
परीला दिसल्या जखमा दहा,
तेव्हापासून सगळ्या परी,
चालू लागल्या अधांतरी....
फार पूर्वी प्रसादने ऐकवलेली ही कविता आज आठवली आणि न्यू इंडिया सेंटर मधले भरभरून जगलेले आणि आता काळाच्या ओघात हरवून गेलेले ते सोनेरी क्षण पुन्हा एकदा आठवले..
1 comment:
मॅडम गंमत बघा, मी तुम्हाला या कवितेचं ऐकवलेलं रसग्रहण कोणी नेट वर लिहिलं आहे का हे शोधत असताना गुगल ने नेमकं तुमच्या ब्लॉग वर नेलं. माझाच संदर्भ वाचून मला गंमत वाटली
Post a Comment